नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि नेता इमरान खान पुन्हा एकदा आपल्या पर्सनल लाइफ संदर्भात चर्चेत आहे. इमरानच्या जीवनावर क्रिस्टोफर सँडफोर्ड या लेखकाने एक पुस्तक लिहीले आहे.
या पुस्तकात दावा करण्यात आला आहे की, ऑक्सफर्ड विद्यापीठात पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि त्यांच्यासोबत शिकणारे इमरान खान यांच्या प्रेम संबंध होते. तसेच त्याचे शारिरीक संबंधही निर्माण झाले होते.
इमरान खान आपल्या संबंधाबद्दल खूप सिरीअस होते. त्याने आपल्या आईलाशी बेनझीरची भेट घालून दिली होती. पण राजकीय आणि कौटुंबिक दबावामुळे इमरानशी दूर होण्याचा निर्णय बेनझीरने घेतला होता. त्यानंतर दोघांमध्ये शत्रूत्व असे निर्माण झाले की ते कायम राहिले.
सँडफोर्ड यांनी आपल्या पुस्तकासाठी इमरान आणि त्याची माजी पत्नी जेमिमा या दोघांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर ही गोष्ट समोर आली आहे.
इमरान आणि बेनझीर यांचे संबंध पुढे कायम राहिले नाही याचं कारणं सँडफोर्ड यांनी आपल्या पुस्तकात दिले आहे. इमरान थोडे रसिक असल्याने बेनझीर त्याच्यासोबत राहिली नाही. ही गोष्ट इमरानच्या एका मित्राने लेखकाला सांगितले. बेनझीर आणि इमरान यांचे प्रेमसंबंध होते त्यावेळी बेनझीर फक्त २१ वर्षांची होती.
दरम्यान इमरानने अफेअरबद्दल खंडन केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.