नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला इंडोनेशियाच्या बालीमध्ये रविवारी अटक करण्यात आली. राजन याला अटक झाली नसून त्याने स्वतःला अटक करण्यात आली असल्याचे समोर येत आहे.
अधिक वाचा : मोस्ट वॉण्टेड गँगस्टर छोटा राजनला इंडोनेशियामधून अटक
राजन का अटक होऊ इच्छित होता
- छोटा राजन याची तब्येत खूप खराब आहे. त्याला रोज मेडिकल चेकअपला जावे लागायचे.
- त्याचे वय वाढले आहे.
- अनेक प्रमुख सहकारी वेगळे झाल्याने त्याची ताकद कमी झाली आहे.
- खराब तब्येक आणि वाढलेल्या वयामुळे त्याला दाऊदपासून स्वतःला वाचविणे आणि त्यापासून दूर पळणे खूप अवघड झाले होते. त्याला दाऊदपासून धोका आहे.
अधिक वाचा : छोटा राजनबद्दलच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी!
राजनला अटक होऊ नये यासाठी दाऊद करत होता प्रयत्न?
- दाऊदला राजनला मारायचे होते.
- दाऊदला वाटत असते की तो अटक व्हावा तर त्याने सप्टेंबर २०००मध्ये बँकॉक ाणि २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियात त्याला अटक करण्यात मदत करू शकला असता. पण दाऊदला त्याला मारायचे आहे.
अधिक वाचा : छोटा राजनला झाली अटक पण तो हसतोय...
सूत्र : अनेक दिवसांपासून राजनसोबत भारतीय गुप्तचर संस्थाचे सौदे सुरू होते. जेव्हा गरज पडली तेव्हा गुप्तचर संस्थांना त्याने मदत केली. आता वेळ आली होती की गुप्तचर संस्था त्याची मदत करतील. राजनने शेवटी संस्थांना त्याचा प्रवासाचा प्लान आणि लोकेशन सांगितले. तो ऑस्ट्रेलियातून इंडोनेशिया आणि इंडोनेशियातून भारतात येणार आहे. भारतीय गुप्तचर संस्थाने इंडोनेशियन अधिकाऱ्यांना अलर्ट दिला आणि राजनला अटक करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.