बाली : आता छोटा राजनसंबंधात धक्कादायक बातमी...छोटा राजनचा हा फोटो पाहा...यात फोटोत छोटा राजन निवांत दिसतोय...एवढंच नव्हे तर राजन हसताना दिसतोय.
त्याच्या बाजुला उभा असलेला पोलीसही हसताना दिसतोय..गेल्या दोन दशकांपासून छोटा राजन फरार आहे. आणि आता अटक झाल्यानंतर तो हसताना दिसतोय. राजनच्या या खुषीचं रहस्य फारच मजेशीर आहे.
अधिक वाचा : मोस्ट वॉण्टेड गँगस्टर छोटा राजनला इंडोनेशियामधून अटक
या फोटोंवरून असं दिसतय की छोटा राजनला स्वत:हून अटक करून घ्यायची होती. दाऊदला डिवचण्यासाठीच त्यानं हा हसतानाचा फोटो काढून घेतल्याचीही चर्चा आहे.
अधिक वाचा : छोटा राजनबद्दलच्या पाच महत्त्वाच्या गोष्टी!
दाऊदची गँग गेल्या कित्येक वर्षांपासून राजनच्या हत्येचा प्रयत्न करत आहे. मात्र राजन या हल्ल्यांमधून बचावला आहे. त्यामुळं स्वत:च्या सुरक्षेसाठीच राजननं शरणागती पत्करल्याचं बोललं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.