बाली, इंडोनेशिया: इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी रविवारी भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर छोटा राजनला अटक केलीय. राजेंद्र सदाशिव निकाळजे जो छोटा राजन म्हणून प्रसिद्ध आहे.... भारतातीय अनेक प्रकरणांमध्ये तो मोस्ट वॉन्टेड आहे.
पाहा ओरिजनल फोटो खाली
Gangster Chhota Rajan arrested in Bali (picture credit: NCB-Interpol Indonesia) pic.twitter.com/GC010sefCg
— ANI (@ANI_news) October 26, 2015
ऑस्ट्रेलियन पोलिसांनी एका गुप्त सूचनेच्या आधारे कारवाई करत सिडनीहून बालीच्या एका रिसोर्टमध्ये आलेल्या छोटा राजनला पकडलं, बाली पोलिसांनी न्यूज एजंसी एएफपीला माहिती देतांना हे सांगितलं.
५५ वर्षीय राजन दोन दशकांपासून वॉन्टेड आहे. आम्हांला कॅनबेरा पोलिसांकडून रविवारी सूचना मिळाली, असंही बाली पोलिसांनी सांगितलं. रविवारी विमानतळावर या संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली. जो भारतातील १५-२० हत्यांमधील तो आरोपी आहे.
बाली पोलीस आता इंटरपोल आणि भारत सरकारच्या संपर्कात आहे. राजनला भारताकडे हस्तांतरित करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी सांगितलं की, निखाळजे ऑस्ट्रेलियामध्ये नाव बदलून राहत होता. भारतीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्याच्या ओळखीबाबत निश्चिती करण्यात आली... नंतर ही कारवाई केली गेली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.