हांगझोऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय संवादामध्ये ब्रिक्स संघटनेला एक प्रभावशाली आवाज म्हटलं आहे. ब्रिक्स (ब्राजील, रूस, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) समूहाची ही जबाबदारी आहे की त्यांनी जागतिक अजेंड्याला आधार द्यावा. ज्यामुळे विकसनशील राष्ट्रांना त्यांचा उद्देश पूर्ण करण्यास मदत होईल.
गोवा येथे 15-16 ऑक्टोबरला आठवं शिखर संम्मेलन होणार आहे. त्याआधी चीनमध्ये ब्रिक्सच्या एका बैठकीचं अध्यक्षपद भूषवत म्हटलं की, ब्रिक्स एक बुलंद आवाज आहे.
ब्रिक्समध्ये पाच प्रमुख उभरत्या अर्थव्यवस्था आहेत. जगातील 43 टक्के लोकं या देशांमध्ये राहतात. जागतिक उत्पादनात या देशांचा उत्पादन 37 टक्के आहे. जागतिक व्यापारात ब्रिक्सचा वाटा १७ टक्के आहे.
पंतप्रधानांनी म्हटलं की, आपण दायित्वपूर्ण, समावेशी आणि सामूहिक समाधान निर्माण करण्याचा विषय निवडला आहे. जी-20 शिखर सम्मेलनात या गोष्टींना प्राधान्य असेल.