पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील 'शार्ली हेब्डो' या फ्रेंच मासिकाच्या कार्यालयावर आज बुधवारी दोन शस्त्रधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात १२ जण ठार झालेत. या हल्ल्याची जबाबदारी ISIS(इसिस)ने स्वीकारली आहे. याबाबतचे कथित ट्विट प्रसिद्ध झालेय.
दहशतवाद्यांनी 'अल्लाह हू अकबर'च्या घोषणा देत 'शार्ली हेब्डो'च्या कार्यालयात प्रवेश करत अंदाधुंद गोळीबार केला. त्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात साप्ताहिकाचे संपादक स्टीफेन चार्बोनर यांचा समावेश आहे. त्यांनी मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. त्यामुळे त्यांच्यावर हा हल्ला केल्याचे इसिसने म्हटले आहे.
स्वतंत्र पत्रकारिता आणि मोकळेपणाने विचार मांडणारे मासिक म्हणून ''शार्ली हेब्डो'' हे प्रचलित आहे. या मासिकाने 'डेनिश' मासिकात प्रसिद्ध झालेले मोहम्मद पैगंबर यांचे वादग्रस्त कार्टून दुसर्यांदा प्रकाशित केले होते. त्यानंतर अलकायदाने संपादक स्टीफेन चार्बोनर यांना ठार मारण्याची धमकी या आधी दिली होती.
धमकीनंतरही चार्बोनर यांनी आपल्या मासिकात पैंगबर यांचे कार्टून प्रकाशित करणे बंद केले नाही. आम्ही जगातील अन्य धर्माशीसंबंधित कार्टून बनवू शकतो तर, इस्लाम धर्माशीसंबंधीत कार्टून बनवण्यात काय हरकत आहे, असे चार्बोनर नेहमी सांगत असे. त्याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तसेच अन्य देशांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.