26/11च्या हल्ल्यात होता पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात - चीन

चीननं पहिल्यांदाच 26/11च्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता हे सत्य आता मान्य केलंय. चीनच्या सरकारी वाहिनीवरून काही दिवसांपूर्वी 26/11च्या हल्ल्यावरची एक डॉक्युमेंटरी प्रसारित करण्यात आली. डॉक्युमेंट्रीत लष्कर-ए-तोएबा आणि पाकिस्तानतल्या दहशतवाद्यांच्या हँडलर्सची भूमिकाही अधोरेखीत करण्यात आली.

Updated: Jun 8, 2016, 06:28 PM IST
26/11च्या हल्ल्यात होता पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात - चीन title=

नवी दिल्ली : चीननं पहिल्यांदाच 26/11च्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात होता हे सत्य आता मान्य केलंय. चीनच्या सरकारी वाहिनीवरून काही दिवसांपूर्वी 26/11च्या हल्ल्यावरची एक डॉक्युमेंटरी प्रसारित करण्यात आली. डॉक्युमेंट्रीत लष्कर-ए-तोएबा आणि पाकिस्तानतल्या दहशतवाद्यांच्या हँडलर्सची भूमिकाही अधोरेखीत करण्यात आली.

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांवर संयुक्त राष्ट्र संघातर्फे बंदी घालण्यावर चीननं नकार दिला होता. त्यानंतर झालेला चीनच्या भूमिकेतल्या बदलामुळे हाफिज सईद विरोधात भारतानं आणलेल्या बंदीच्या प्रस्तावाला आता मान्यता मिळणार आहे.