नवी दिल्ली : चीनचे राष्ट्रपती जिनपिंग भारताच्या ऐतिहासिक दौ-यावर आले असतांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची स्वागत केले. तर तिबेटी जनतेनं नवी दिल्लीत निषेध प्रदर्शनं केली. तिबेटवर चीननं दडपशाही केल्याचा तिबेटी लोकांचा आरोप आहे.
चीनच्या धोरणांमुळं निर्वासिताचं आयुष्य जगावं लागतं अशी भावना तिबेटी लोकांच्या मनात आहे. तिबेटी लोकांच्या मुक्ततेसाठी दलाई लामांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरु आहे. जिनपिंग यांच्या दौ-याच्या निमित्तानं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तिबेटी जनतेनं हे आंदोलन केलं होतं..
दरम्यान, चीनचे अध्यक्ष जिंनपिंग यांचं भारतात स्वागत झालंय. अहमदाबादमध्ये जिनपिंग आले आहेत. त्यांचा तीन दिवसांचा भारत दौरा सुरू झालाय. अहमदाबादमध्येच प्रोटोकॉल मोडून पंतप्रधान मोदी जिनपिंग यांची भेट घेतली. आज जिनपिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यात अहमदबादमध्ये भेट झाली. त्यानंतर रात्री अहमदाबादमध्ये भारताच्या पंतप्रधानांतर्फे जिनपिंग यांच्यासाठी खास दावत दिली जाणार आहे. त्यानंतर उद्या नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यात महत्त्वाच्या बैठका आणि करारमदार होणार आहेत. दौ-यात जिनपिंग भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.