१६ वर्षाच्या विद्यार्थीनीकडून हेडमास्तर मागवत होता न्यूड फोटो

 एक ६२ वर्षीय उपप्राचार्याला आपल्या १६ वर्षीय विद्यार्थीनीकडून न्यूड फोटो मागविणे महागात पडले. शिक्षकाला या अश्लिल कृत्याबद्दल सुमारे १७ लाख रुपयांचा दंड करण्यात आला. 

Updated: Dec 1, 2015, 03:59 PM IST
१६ वर्षाच्या विद्यार्थीनीकडून हेडमास्तर मागवत होता न्यूड फोटो  title=

लंडन :  एक ६२ वर्षीय उपप्राचार्याला आपल्या १६ वर्षीय विद्यार्थीनीकडून न्यूड फोटो मागविणे महागात पडले. शिक्षकाला या अश्लिल कृत्याबद्दल सुमारे १७ लाख रुपयांचा दंड करण्यात आला. 

हे प्रकरण इंग्लडमधील एका शाळेतील आहे. ही शाळा राजकुमारी डायनाच्या स्मृती प्रित्यर्थ स्थापन करण्यात आली आहे. ही शाळा वेस्ट हिथ भागात आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यावर उपप्राचार्य विल्यम व्हिललॉक यांच्या विरोधात प्रकरण दाखळ कले. 

विल्यम यांनी किशोरवयीन विद्यार्थीनीच्या खासगी आयुष्याचा भंग केला आहे आहे त्यामुळे त्याला दोषी ठरविण्यात आले आणि २५ हजार युरो म्हणजे १७ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. 

या उपप्राचार्याने विद्यार्थीनीवर दबाव टाकून तिचे न्यूड फोटो पाठविण्यासा सांगितले होते. विशेष म्हणजे शाळेने या उपप्राचार्याला विद्यार्थ्यांच्या संरक्षणाचा इन्चार्ज बनविले होते. 

एका रात्री विल्यम यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की तुझ्या प्रायव्हेट पार्टचा फोटो पाठव मला जरूरी काम आहे. त्यानंतर दबावात येऊन विद्यार्थीनीने फोटो पाठविले. त्याने नंतर आणखी फोटो पाठविण्यास सांगितले. 

या प्रकरणी पोलिसांनी त्याचा मोबाईल आणि कम्युटर जप्त केला त्यात फोटो सापडले. या प्रकरणानंतर आरोपीला नोकरीतून बरखास्त करण्यात आले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.