ढाका : ढाक्यातील कॅफेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातीस सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.
बांग्लादेशची राजधानी ढाकाजवळ पोलीसांनी दहशतवाद्यांना दिलेल्या प्रत्युत्तरात गुलशन कॅफे हल्ल्याचा मास्टरमाईंड तमीम अहमद चौधरी याच्यासोबतच आणखीन चार संदिग्ध 'इस्लामिक कट्टरतावाद्यांना' कंठस्नान घालण्यात आलंय.
वरीष्ठ पोलीस अधिकारी सनवर हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलशन हल्ल्याचा मास्टरमाईंड तमीम हा कॅनडा-बांग्लादेशी नागरिक होता.
जुलै महिन्यात ढाक्यात एका पॉश मॉलमध्ये दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला होता. या हल्ल्यात २२ लोकांचा मृत्यू झाला होता यातील १८ जण परदेशी नागरिक होते.