'अॅनाकोंडा'च्या पोटात शिरून दृश्यं टीपण्याचं साहस

आपल्या कामाची आवड आणि साहस आपल्याला कुठवर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. एका टेलिव्हिजन चॅनलसाठी एक बहाद्दर तर थेट अॅनाकोंडाच्या पोटातच दाखल झालाय.

Updated: Nov 11, 2014, 10:19 AM IST
'अॅनाकोंडा'च्या पोटात शिरून दृश्यं टीपण्याचं साहस title=

नवी दिल्ली : आपल्या कामाची आवड आणि साहस आपल्याला कुठवर घेऊन जाईल हे सांगता येत नाही. एका टेलिव्हिजन चॅनलसाठी एक बहाद्दर तर थेट अॅनाकोंडाच्या पोटातच दाखल झालाय.

होय, पोल रोजोली यानं ‘डिस्कव्हरी’ चॅनलसाठी आपल्या आयुष्याचा धोका पत्करत अॅनाकोंडाच्या पोटात शिरायचं धाडस करून दाखवलंय.

यासाठी त्यानं एका ‘स्नेक प्रूफ जॅकेट’ची मदत घेतली. या जॅकेटमुळे तो अजगराच्या पोटात जाऊनही सुरक्षित राहू शकलाय. 

टेलिव्हिजन चॅनल ‘डिस्कव्हरी’वर डिसेंबर महिन्यात ७ तारखेला हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. एका विशाल ‘अॅनाकोंडा’ या अक्राळ-विक्राळ अजगराच्या पोटात शिरून शूट करण्याचं धाडस रोजोली यानं दाखवलेलं यात पाहायला मिळेल.

परंतु, याच बद्दल प्राणी-पक्षी प्रेमींनी मात्र डिस्कव्हरी चॅनलवर टीका केलीय. कारण, त्यांना या कार्यक्रमामुळे हा अजगर गतप्राणही होऊ शकतो, अशी भीती आहे. कारण, यावेळी रोजोली बरोबरच तो त्याचा पोशाखही गिळणार आहे. 

व्हिडिओ पाहा :-
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.