न्यूयॉर्क : संपूर्ण जगानं योगाला सलाम केला. आता भारताकडून अमेरिकेला एक गिफ्ट देण्यात येणार आहे. एस्सेल ग्रुप अमेरिकेत एक वेलनेस सेंटर उघडणार आहे आणि याचं भूमीपूजन एस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रांनी न्यूयॉर्कमध्ये केलं.
न्यूयॉर्कमध्ये १३०० एकर जमीनीवर हे वेलनेस सेंटर बांधण्यात येणार आहे. यामध्ये रिसॉर्टही असेल आणि ज्यात शंभरहून अधिक रुम्स असतील. यासाठी १०० मिलियन डॉलर खर्च करण्यात आलेत.
१२ ते १३ महिन्यात हे वेलनेस सेंटर तयार होईल. आयुर्वेद, योगा आणि नेचुरोपथीच्या मदतीनं लोकांना तंदुरुस्तीचा मंत्र देण्यात येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.