लंडन: संशोधकांनी एक महत्त्वाचा शोध लावलाय. संशोधकांनी अंतराळातून मिळालेल्या मलब्यात एका सावलीप्रमाणे 'घोस्ट पार्टिकल' शोधलंय. यामुळं अंतराळात एलियन असल्याची शक्यता वाढलेली आहे.
बर्किंघम किंवा शेफिल्ड युनिव्हर्सिटीमध्ये अॅस्ट्रोबायोलॉजी केंद्रातील संशोधकांनी एक छोटासा अंश शोधून काढलाय. त्याचं नाव त्यांनी 'लिव्हिंग बलून' ठेवलंय. संशोधकांच्या मते याचा वापर कधी एलियनच्या सुक्ष्म शारीरिक बनावटीला घेऊन जाण्यास केला गेला असेल. संशोधकांचा दावा आहे की, 'घोस्ट पार्टिकल'मुळे हे स्पष्ट होतंय की, अंतराळात एलियन आहे.
संशोधक मिल्टन वेनराइट यांचं म्हणणं आहे की, मिळालेलं पार्टिकल हे ओढणीच्या जाळीसारखा आहे. ज्याची रूंदी मानवाच्या केसासारखी आहे. हे पार्टिकल पृथ्वीच्या स्ट्रेटस्फीयरच्या २७ किलोमीटरवर आढळलंय. हे पार्टिकल आपल्या प्रकृतीत जैविक आहे आणि कार्बन-ऑक्सिजननं बनलेलं आहे.
वेनराइट यांच्या मते आपण अंदाज लावू शकतो की, या अंतराळातील वातावरणात हे 'घोस्ट पार्टिकल' एका लिव्हिंग बलून सारखं आहे. ज्याचा वापर एलियन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी करू शकतो. आतापर्यंत अशाप्रकारचं पार्टिकल मिळालं नव्हतं, असं वेनराइट म्हणाले.
(एजंसी इनपुटसह)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.