एव्हरेस्टवर एवलांचमध्ये गूगलच्या अधिकाऱ्याचा मृत्यू

नेपाळसह संपूर्ण उत्तर भारतात आलेल्या भूकंपामुळे जीवन आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय. नेपाळमध्ये आतापर्यंत १९०० हून अधिक जणांच्या मृत्यू झालाय. भारतातही भूकंपामुळे ५१ जणांचे प्राण गेले आहेत. 

Updated: Apr 26, 2015, 04:16 PM IST
एव्हरेस्टवर एवलांचमध्ये गूगलच्या अधिकाऱ्याचा मृत्यू title=

नवी दिल्ली: नेपाळसह संपूर्ण उत्तर भारतात आलेल्या भूकंपामुळे जीवन आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय. नेपाळमध्ये आतापर्यंत १९०० हून अधिक जणांच्या मृत्यू झालाय. भारतातही भूकंपामुळे ५१ जणांचे प्राण गेले आहेत. 

या संकटात जगातील सर्वात मोठी इंटरनेट सर्च कंपनी गूगलचे एक कार्यकारी अधिकारी डॅनियल क्रेडिनबर्ग य़ांचा मृत्यू झालाय. डेनियलचा मृत्यू माउंट एव्हरेस्टवर अचानक आलेल्या एवलांचमध्ये झाला. माउंट एव्हरेस्टवर एवलांचमध्ये १७ गर्यारोहकांचे मृतदेह बाहेर काढलेत.

या दुर्घटनेची माहिती देतांना गूगलचे प्रायव्हसी विभागाचे डायरेक्टर लॉरेंस यूनं लिहीलं, 'या दुर्घटनेमध्ये आम्ही आमचा जवळील व्यक्ती गमावलाय. डेनियल अनेक काळापासून गूगलच्या प्रायव्हसी विभागाचे मेंबर होते.'

ते म्हणतात, 'डेनियलसोबत माउंट एव्हरेस्टवर गूगलचे तीन आणखी कर्मचारी गेले होते. ते तिघंही सुरक्षित आहेत. त्यांना लवकरच परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डेनियलचे कुटुंबिय आणि नेपाळच्या नागरिकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.'

बचावकार्यासाठी गूगल १० लाख डॉलर्सची मदत करणार असल्याचंही लू यांनी जाहीर केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.