लंडन : गांधीजींचे छायाचित्र असलेले भारतीय पोस्ट स्टॅम्प ब्रिटेनमध्ये ४ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. हे पोस्ट स्टॅम्प विकणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, आतापर्यंत पोस्ट स्टॅम्पला मिळालेली ही सर्वात मोठी किंमत आहे. हे ४ पोस्ट स्टॅम्प एका ऑस्ट्रेलियन कलेक्टरला विकण्यात आले आहेत.
तसेच ब्रिटेनमध्ये राहणारे व्यावसायिक स्टेनली गिबन्सने सांगितले आहे की, १९४८ मधील गांधीजींचे छायाचित्र असलेल्या जांबळ्या-तपकीरी रंगाचे १० रुपयांचे आणि लेक सर्व्हिसवाले फक्त १३ पोस्ट स्टॅम्प सर्कुलेशनमध्ये आहेत.
त्याआधी याच वर्षी मार्चमध्ये चार आण्याचे शिक्के ९,१०६,४३४.६३ रुपयांना विकले गेले होते. त्यानंतर हे पोस्ट स्टॅम्प कोटींमध्ये विकले गेले आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त किंमतीत विकलेल्या पोस्ट स्टॅम्पची रेकॉर्ड किंमत ९ कोटी ५० लाख एवढी आहे.
भारतीय जुन्या तिकिटांचा हा संग्रह खूप दुर्मिळ प्रमाणात आहे. त्यात या दुर्मिळ भारतीय वस्तूंची खरेदी करणारे आंतरराष्ट्रीय ग्राहक वाढले आहेत. त्यामुळे या बाजारपेठेला मोठी मागणी आहे, असे स्टेनली गिबन्स यांनी म्हटलं आहे.