www.24taas.com , वृत्तसंस्था, त्रिपोली
लिबियाचे पंतप्रधान अली झेदान यांचं काही अतिरेक्यांनी त्रिपोली येथील एका हॉटेलमधून अपहरण करण्यात आलं. मात्र काही तासांनंतरच नाट्यमय रित्या त्यांची सुटकाही करण्यात आली.
अल् कायदाचा संशयीत अतिरेकी अबू अनास अल् लिबी याला अमेरिकेच्या कमांडोंनी परस्पर कारवाई करून, त्रिपोली येथून ताब्यात घेतलं होतं या घटनेनंतरच हे अपहरण घडलंय.
काही अज्ञात शस्त्रधारी लोकांनी त्रिपोलीतील एका हॉटेलमधून पंतप्रधानांचं अपहरण केलं. अली झिदान नुकतेच लिबियाच्या पंतप्रधानपदी निवडले गेले होते.
लिबियाच्या सुरक्षादलांनी दिलेल्या माहितीनुसार, लिबियाची राजधानी त्रिपोलीमधील एका हॉटेलमध्ये पंतप्रधान अली झिदान असतांना आज पहाटे काही सशस्त्र इसम हॉटेलात घुसले आणि शस्त्राच्या धाकावर त्यांनी झिदान यांना जबरदस्तीनं उचलून नेलं.
झिदान यांचा शोध लागला नव्हता. अपहरणकर्त्यांकडून सरकारशी कोणताही संपर्क करण्यात आलेला नसल्यानं हे लोक कोणत्या संघटनेचे आहेत, हे कळू शकलेलं नव्हतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.