वॉशिंग्टन : मलेशिया एअरलाईन्सचे MH-17 हे बोइंग प्रवासी विमान क्षेपणास्त्राने पाडणाऱ्या रशिया समर्थक बंडखोर जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. युक्रेनमधील बंडखोरांना रशियाचा पाठिंबा असल्याचे, ओबामा म्हणालेत.
युक्रेनमधील बंडखोरांना रशिया सातत्याने पाठिंबा देत आहे. त्यामुळे अशा घटना घडतात. मलेशियन विमान अपघातामुळे युरोपासह जगाला धक्का बसला आहे. हे विमान युक्रेनमधील बंडखोरांनीच क्षेपणास्त्र डागल्याचा संशय व्यक्त होत आहे. असे असताना अमेरिकेने थेट रशियाला जबाबदार धरले आहे.
मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनीही या प्रकरणाचा शोध घेऊन दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. तर या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी व्हावी, अशी मागणी जगभरातील नेत्यांकडून होत आहे.
विमानात असलेल्या सर्व प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत 181 जणांचे मृतदेह हाती लागलेत. विमानात नेदरलॅंडचे 154, मलेशियाचे 43, ऑस्ट्रेलियाचे 27, इंडोनेशियाचे 12, ब्रिटनचे 9, जर्मनीचे 4, बेल्जियमचे 4, फिलिपिन्सचे 3 आणि कॅनडाचा एक नागरिक होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.