क्वालालंपूर : भारतीय वंशाचे विमान कर्मचारी संजित सिंग संधू यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत शिफ्ट बदलली आणि त्याची किंमत त्यांना आपले प्राण देऊन मोजावी लागली.
४१ वर्षीय संजित सिंग यांनी आपली शिफ्ट एक सहकाऱ्यासोबत बदलून अॅम्सटरडॅमहून क्वालालंपूरला जाणाऱ्या दुदैवी विमान एमएच १७ मध्ये लावली. या विमानाला काल सायंकाळी युक्रेनमध्ये पाडण्यात आले. विमानातील २९८ प्रवाशांचा मृत्यू झाला.
संजिद याचे वडील जिजर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार संजीद यांची आई मलेशियातील पेनांग येथे पोहचल्यावर आपल्या मुलासाठी आवडीचे जेवण तयार करणार होती. डोळ्यातून सतत वाहणाऱ्या अश्रूंना पुसत संजितचे वडील पत्रकारांशी बोलत होते. उड्डाण घेण्यापूर्वी ही गोष्ट माझ्या मुलाने मला सांगितली होती, मला माहित नव्हते की ते त्याचे शेवटचे बोलणे असेल.
संधू यांच्या आई-वडिलांना त्यांच्या सुनेकडून या दुर्घटनेचे वृत्त समजले. त्यांची सूनदेखील मलेशियन एअरलाइन्सची विमान कर्मचारी आहे.
अॅमस्टरडॅम येथून क्वालालंपूरकडे जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या हे विमान पूर्व युक्रेनमधील डॉनेत्स्क प्रांतात पडले. त्याचे अवशेष मोठ्या भागावर विखुरले गेले. ज्या ठिकाणी विमान पडले त्या ठिकाणी आगीचा मोठा लोळ उठला होता. या विमान दुर्घटनेत मृतदेह अस्ताव्यस्त पडले होते.
संबंधित विमानात २९८ प्रवासी असल्याच्या माहितीला मलेशियन एअरलाइन्सने शुक्रवारी दुजोरा दिला. ओळख पटलेल्या प्रवाशांपैकी १५४ डच, तसेच १५ कर्मचाऱ्यांसह एकूण ४३ मलेशियन, २७ ऑस्ट्रेलियन, १२ इंडोनेशियन्स, नऊ ब्रिटिश, चार जर्मन, चार बेल्जियन, तीन फिलिपिनो आणि एक कॅनेडियन असे लोक होते. अद्याप ४१ प्रवाशांच्या देशाची माहिती समजू शकलेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.