काठमांडू: नेपाळमध्ये भूकंपामुळे खूप हानी झालीय. पण अशातच काही चमत्कारासारख्या बाबी पुढे येत आहेत. एक चांगली बातमी म्हणजे भूकंपाच्या तब्बल ८४ तासांनंतर एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आलंय.
पीडित गोंगबू परिसारातील सात मजली इमारतीच्या ढिगाऱ्यात दबला गेला होता. त्याला वाचविण्यासाठी तब्बल १० तासांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं गेलं. ऋषी खनाल असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाला वाचविण्यासाठी नेपाळचं पोलीस दल आणि फ्रेंच रेस्क्यू टीमनं शर्थिचे प्रयत्न केले.
नेपाळमधील भूकंपाचा आजचा पाचवा दिवस आहे. भूकंपामुळे नेपाळ उद्ध्वस्त झालंय. नेपाळमध्ये भारत आणि जगातील काही देशांच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.