दमिश्क : सीरियात ईसीसीने धुमाकूळ घातला आहे, दहशतवाद्यांच्या कचाट्यात सापडण्यापेक्षा देश सोडलेला बरा, यासाठी युरोपकडे पळ काढणाऱ्या नागरिकांना तस्करांवर विश्वास करावा लागतोय.
सिरियाच्या नागरीक असलेल्या महिला डॉक्टरवर हल्ला झाला, त्यांच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. सिरियाची राजधानी दमिश्कमध्ये डॉ.जिजित एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या, इस्लामिक स्टेटच्या एका माणसाने त्यांना संपर्क करून, इसीसीसाठी काम करण्यास सांगितलं, नाही म्हटल्यावर त्यांना धमकीही देण्यात आली.
मुलीसह देश सोडायचा होता पण...
महिला डॉक्टर जिजित यांनी आपल्या अडीच वर्षाच्या मुलीसह देश सोडण्याचा निर्णय घेतला.
महिला डॉक्टर एका मानवी तस्काराला भेटली, अबू शहाब असं त्याचं नाव होतं, या बदल्यात त्याला ४ हजार युरो देण्यात आले, त्याबदल्यात त्याने ब्राझिलचा बनावट पासपोर्ट दिला.
अखेर अडीच वर्षाच्या मुलीला तस्कराकडे सोपवलं
पण आई डॉ जिजित आणि मुलगी माया एकाच वेळेस प्रवास करू शकत नव्हते, तेव्हा ती कुणीतरी युरोपीय माणसाची मुलगी आहे असं दाखवण्यासाठी तिला त्या तस्करासोबत प्रवास करावा लागणार होता.
लहान मायासाठी आईचं जड अंतकरण
पण लहानगी माया खूप रडत होती. त्या तस्कराने तिला खायला मिठाई, चॉकलेट दिले, पण तिला तिच्या आईपेक्षा काहीही गोड नव्हतं. माया खूप रडली, तेव्हा तिला थोडसं समजवण्यात आलं. आणि अखेर लहानग्या मायाला एका अनोळखी माणसाकडे, आपल्या काळजाच्या तुकड्याला डॉ. जिजित यांनी अतिशय जड अंतकरणाने सोपवलं.
आईपासून मुलगी हजारो किलोमीटर लांब गेली
अखेर माया त्या तस्करासोबत निघाली, तस्कराने माया आपली मुलगी असल्याचं छानपैकी नाटक केलं, यामुळे विमानतळावर सुरक्षा रक्षकांचा घेरा तस्कर आणि लहानग्या मायाने पार केला, पण मायाची आई डॉ. जिजित यांचा पासपोर्ट बनावट असल्याचं सांगण्यात आल्याने त्यांना तेथेच थांबवण्यात आलं. मात्र माया आईपासून हजारो किलोमीटर दूर एका अनोळखी तस्करासोबत निघून गेली. ती जर्मनीत पोहोचली.
तस्कर कधीच खरं नाव सांगत नाहीत
डॉ.जिजित खूपच चिंतेत होत्या, तस्कराला त्या जास्त ओळखत नव्हत्या. तस्कर कधीच आपलं खरं नाव सांगत नाहीत असंही सांगितलं जातं.
तस्कराला प्रचंड झापलं
मात्र या तस्कराने दुसऱ्या दिवशी डॉ. जिजित यांना फोन केला. डॉ.जिजित या त्या तस्करावर प्रचंड रागावल्या, त्याने बराच वेळ त्यांचं बोलणं ऐकूण घेतलं आणि सांगितलं, मॅम मी एक तस्कर असलो, तरी मी सुद्धा एक माणूस आहे. या तस्कराने या मुलीला न्हावू-खावू घातलं, सर्व प्रकारचे लाड केले, तुझी आई लवकरच तुझ्या जवळ येईल असं सतत समजावलं, तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला.
अनोळखी तस्कराने माणुसकी दाखवली नसती तर....
डॉ.जिजित यांना मोबाईलवर सतत त्यांच्या मुलीचे फोटो पाठवले, यासाठी की डॉ जिजित यांना त्यला विश्वास द्यायचा होता, तुमची मुलगी माझ्याकडे सुरक्षित आहे.
दूर देशी मायाला मायेचा हात हवा होता
पण हा तस्कर हॉटेलमध्ये राहत होता, लहानग्या मायाला महिलेच्या मायेचा हात हवा होता, तेव्हा डॉ.जिजित यांची एक पेशंट जर्मनीत होती, त्यांनी तिच्यावर उपचार केले होते, तेव्हापासून त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या मुलीला तिच्या घरी ठेवण्याची विनंती केली, त्याही एकेकाळच्या पेशंट महिलेनेही या मुलीला घरी नेले.
काहीतरी करून डॉ.जिजित जर्मनीला अखेर पोहोचल्या, आता त्यांची मुलगी आणि डॉक्टर जर्मनीत डार्टमुंड शहरात राहतात.
मुलगी हरवण्यापेक्षा मरण कधीही बरं....
मात्र डॉ.जिजित यांना विचारलं की तुमचा मायाला असा पाठवण्याचा निर्णय योग्य होता का, तर त्या जोर देऊन नकार देतात. माझ्या सारखा मुलीशिवाय प्रवास कधीच करू नका, आपली मुलगी हरवण्यापेक्षा मरण कधीही बरं असं डॉ. जिजित म्हणतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.