न्यूयॉर्क : अमेरिकेत सध्या व्हाईट इमरजन्सी, अमेरिकेच्या सर्व ५० राज्यात शून्य अंशांखाली पारा उतरला. बर्फामुळे अनेक हायवे बंद असून १९७६ नंतर प्रथमच पडली एवढी थंडी पडली आहे. या थंडीचे सात जण बळी गेले आहेत.
अमेरिकेतील ५० राज्यांमधील तापमान शून्यपेक्षा खाली गेलं आहे. या बर्फाच्या वादळापासून स्वत:चा बचाव करण्याकरिता अनेक नागिरकांनी घरातच राहणं पसंत केलं आहे. बर्फाचं वादळाची तीव्रता इतकी भयानक आहे की एरिक आणि ओंटारियो या राज्यांना जोडणारा २२५ किलोमीटर लांबीचा न्यूयॉर्क हायवेही बंद करण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते १९७६ नंतर पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यात इतकी जबरदस्त थंडी पडली आहे. अशा परिस्थीतीत सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयेही बंद केली गेली आहेत. अमेरिकेच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार पश्चिमी अमेरिकेसह पूर्व अमेरिकेच्या काही भागांत तर ६० इंच ते ७६ इंचापर्यंत बर्फ जमा झाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.