www.24taas.com,पियाँगयां
उत्तर कोरियाने आज मंगळवारी तिसरी अण्वस्त्र चाचणी घेतली. पियाँगयां शहरापासून उत्तरेकडे आज सकाळी अण्वस्त्राची चाचणी घेण्यात आली.
उत्तर कोरियाने घेतलेल्या अण्वस्त्राच्या चाचणीमुळे दक्षिण कोरियाने लष्कराला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर, जपानच्या पंतप्रधानांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे.
दरम्यान, उत्तर कोरियाला आज भूकंपाचे तीव्र हादरे बसले. उत्तर कोरियाने अणुचाचणी घेतल्यामुळे भूकंपाचे हादरे बसल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. उत्तर कोरियातील पियाँगयांग शहरात ही अणुचाचणी घेण्यात आली.
अणुचाचणीनंतर काही वेळातच परिसरातील काही भागात भूकंपाचे हादरे बसले. याबाबत दक्षिण कोरियाने याबाबत सावध भूमिका व्यक्त केलीयं. अणुचाचणी कुठे आणि कधी घेण्यात आली, याबाबत नेमकी माहिती घेण्यात येत असल्याचं दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयातर्फे सांगण्यात आलंय.