नवी दिल्ली : उत्तर कोरियाने अमेरिकेला धमकी दिल्यानंतर २४ तासाच्या आतच जपानवर ४ बॅलेस्टिक मिसाइल सोडल्या. जपानच्या ३ एक्सक्लुसिव इकोनॉमिक झोनवर या मिसाईल पडल्या. जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी मिसाइल हल्ल्याची पुष्टी केली आहे.
नॉर्थ कोरियाच्या हरकतीमुळे लगेच साउथ कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ह्वांग क्योअह्न यांनी नॅशनल सिक्योरिटी काउंसिलची आपातकालीन बैठक बोलावली. जपान-अमेरिका आणि साउथ कोरिया हे तीनही देश या घटनेनंतर अलर्ट झाले. या घटनेची अजून विस्तृतपणे माहिती घेतली जात आहे.