सेऊल : उत्तर कोरियाने अुणचाचणी केंद्रात शुक्रवारी पाचवी अणुचाचणी परीक्षण केल्याचा दावा दक्षिण कोरियाकडून करण्यात आला आहे. या अणुचाचणीमुळेच ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंदवण्यात आल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.
या चाचणीची तीव्रता हिरोशीमावर अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा अधिक होती.
दक्षिण कोरियाने दिलेल्या माहितीनुसार अणुचाचणी केल्यानंतरच भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दक्षिण कोरियातील अधिकाऱ्यांच्या मते, एवढ्या तीव्रतेची अणुचाचणी केल्यानंतर भूकंप होण्याची शक्यता अधिक असते. उत्तर कोरियाच्या या अणुचाचणीनंतर जपान आणि दक्षिण कोरिया भूगर्भातील हालचालींवर नजर ठेवून आहे. याआधी ६ जानेवारी रोजी उत्तर कोरियाकडून अणुचाचणी करण्यात आल्यानंतर अशाच प्रकारे कृत्रिम भूकंप झाल्याची नोंद करण्यात आली होती.
अमेरिका आणि युरोप खंडातील भूंकप अभ्यासकांनी या भूकंपाची खातरजमा केली असून त्यांच्या मते उत्तर कोरियाने त्यांची पाचवी अनुचाचणी केल्याची माहिती सेऊलच्या हवामान विभागाने दिली असल्याचे योनहॅप वृत्तसंस्थेने सांगितले आहे. वृत्तसंस्थेच्या मते, दक्षिण कोरियातील हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ५.० तीव्रतेचा कृत्रिम भूकंप म्हणजेच अनुचाचणी परीक्षणच असू शकते.
एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के जाणवलेली ठिकाणं आणि भूकंपाची तीव्रता लक्षात घेता हे अणुपरीक्षणचं असल्याची अधिक शक्यता आहे. ही घटना भूकंप आहे की अन्य काहीतरी याचे मूल्यमापन करत आहोत, असे सेऊलच्या सेनेने म्हटले आहे.
उत्तर कोरियाने पहिली अणुचाचणी २००६ मध्ये केली होती त्यानंतर संयुक्त राष्ट्रा संघाने पाच वेळा अणुचाचणी करायला मनाई केली होती. अणुशस्त्रास्त्रा संबंधित नियमांचे उल्लघंन करत उत्तर कोरियाने यावर्षी अनेक क्षेपणास्त्र चाचण्यादेखील केल्या आहेत.