'निराश होतो तेव्हा हनुमानापासून प्रेरणा घेतो'

जेव्हा निराश होतो तेव्हा बजरंगबलीकडून प्रेरणा घोतो, हे वाक्य आहे जगाची महासत्ता असलेल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाचं. 

Updated: Jan 17, 2016, 12:22 PM IST
'निराश होतो तेव्हा हनुमानापासून प्रेरणा घेतो'

वॉशिंग्टन : जेव्हा निराश होतो तेव्हा बजरंगबलीकडून प्रेरणा घोतो, हे वाक्य आहे जगाची महासत्ता असलेल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाचं. 

निराश होतो, थकवा येतो तेव्हा भगवान हनुमानापासून प्रेरणा घेतो अशी माहिती यू ट्यूबला दिलेल्या मुलाखतीत बराक ओबामांनी दिलीये. ज्या निवडक गोष्टी ओबामा नेहमी जवळ बाळगतात त्यात हनुमानाची मूर्तीही कायम त्यांच्या खिशात असते. 

या मुलाखतीदरम्यान ओबामांनी चक्क आपल्या खिशातील हनुमान आणि भगवान बुद्धांची मुर्तीही काढून दाखवली.