बुर्किना : पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासोत अतिरेकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २० लोक ठार झालेत. हा हल्ला अल कायद्याच्या दहशतवाद्यांनी केलाय.
हा हल्ला हॉटेलवर झाला असून अंदाधुंद गोळीबारही करण्यात आला आहे. या हल्ल्यात एकूण २० ठार झालेत. बुर्किना फासोच्या राजधानीत हा हल्ला झालाय. आतापर्यंत ८ बंधकांची सुटका करण्यात यश आलं आहे.
चार दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. येथील स्थानिक वेळेनुसार साडेसातच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला असून या हॉटेलमधील काही लोकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.
तसेच, या दहशतवाद्यांनी हॉटेलच्या बाहेर असलेल्या दोन गाड्या पेटवून दिल्या आहेत. घटनास्थळी सुरक्षा दलाचे जवान दाखल झाले आहेत. जवानांनी हॉटेलचा परिसर ताब्यात घेतला असून दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.