ओबामा तिच्याबरोबर बोलले अन् मिशेलचा पारा चढला
www.24taas.com, झी मीडिया, जोहान्सबर्ग
कोणत्याही स्त्रीला आपला नवरा दुसऱ्या कोणत्याही महिलेबरोबर जास्त जवळून बोलेला आवडत नाही. तसाच प्रसंग हा मिशेल ओबामा यांच्याबाबतीत घडला आहे. जोहान्सबर्गवर मंगळवारी नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल पोहोचले होते. यावेळी ओबामा डेनिश प्रधानमंत्री हॅले थॉर्निग हिच्याशी गप्पा मारल्या अन् इथंच मिशेल यांचा पारा चढला.
मंडेला यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जोहान्सबर्गवर येथे जगभरातून अनेक देशातून मोठे मान्यवर आणि नेते मंडळीनी हजेरी लावली. ओबामा ही पत्नी मिशेल ओबामा बरोबर होते. ओबामा ज्या ठिकाणी आपल्या पत्नी समवेत बसले होते. त्यांच्या बाजूलाच डेनिश प्रधानमंत्री हॅले थॉर्निग बसल्या होत्या आणि हॅलेच्या बाजूला इंग्लडचे प्रधानमंत्री डेविड कॅमरून बसले होते. यावेळी हॅले, डेविड कॅमरून आणि ओबामा यांनी मोबाईलमध्ये एक छायाचित्र घेतले. छायाचित्र घेत असताना मोबाईल हॅले यांनी पकडला होता आणि ओबामा यांनी देखील मोबाईल पकडून मोबाईल अॅडजेस्ट करत होते. त्यामुळे बराक ओबामा यांची पत्नी मिशेल रागावल्या. त्यांचे डोळे लाल दिसत होते. त्यांना रूचले नाही. त्यांचा राग अनावर झाल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र, खूप गर्दी असल्याने मिशेल यांना काहीही करता आला नाही.
त्यानंतर बराक ओबामानी हॅलेच्या खांद्यावर हातही ठेवला होता. या ओबामाच्या कृत्यामुळे मिशेल यांनी ओबामांकडे कटाक्ष टाकत रागीट नजरेने पाहिले. ही बाब ओबामांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हॅले यांच्याकडे नंतर पाहिले देखील नाही. ओबामा मिशेल यांच्याजवळ येऊन बसल्यानंतर मिशेल यांचा राग निवळला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.