ब्रिटन : एक डासमुळे संपूर्ण जीवनच बदलून जातं ही गोष्ट तुम्हाला खरी वाटंत नसेल पण असं घडलंय. एका तरुणीला वयाच्या १३ व्या वर्षी डास चावल्यामुळे आयुष्यभर त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागत आहे. पायाला डास चावल्यामुळे तिचा पाय जवळपास १२ किलोचा झाला आहे.
डास चावल्यानंतर तिने याकडे दुर्लक्ष केलं. २ दिवसानंतर मात्र तिचा पाय हा अधिकच सुजत चालला असल्याचं तिचं लक्षात आलं. त्यानंतर तिने डॉक्टारांना दाखवलं.
डास पायाला चावल्यामुळे त्याचं इंफेक्शन हे पायामध्ये झालं आणि पायात एक प्रकारचं द्रव्य वाढू लागलं. पायाचा आकार कमी होण्यासाठी या तरुणीने खूप प्रयत्न केला पण तो काही कमी झाला नाही.
पायाचा आकार आता अजून वाढू नये यासाठी ती नियमित त्याची काळजी घेत असते. पण एक मच्छर चावल्यामुळे एखाद्या व्यक्तीचं जीवन किती भयानक पद्धतीने बदलतं हे या घटनेतून समोर आलं.