पाकिस्तानचा खोटा चेहेरा पुन्हा जगासमोर, मानवी अधिकारांचं उल्लंघन

भारत सतत मानवी अधिकारांचं उल्लंघन करत असल्याची ओरड करणा-या कांगावखोर पाकिस्तानचा खोटा चेहेरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. 

Updated: Jan 14, 2017, 03:02 PM IST
पाकिस्तानचा खोटा चेहेरा पुन्हा जगासमोर, मानवी अधिकारांचं उल्लंघन

लाहोर : भारत सतत मानवी अधिकारांचं उल्लंघन करत असल्याची ओरड करणा-या कांगावखोर पाकिस्तानचा खोटा चेहेरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. 

पाकिस्तानकडून त्यांच्याच देशातल्या पश्तून भागातल्या नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले जात आहेत. त्याची दृश्यंच समोर आली आहेत. ड्रग्ज, तसंच मानवी तस्करीकरता हे अत्याचार केले जात असल्याचा आरोप, पश्तूनी नागरिकांनी केलेत. 

पाकिस्तानी अत्याचारांना कंटाळून आतापर्यंत तब्बल पाच लाखांहून अधिक पश्तूनी नागरिक अफगाणिस्तानला स्थलांतरीत झाल्याचं विविध अहवाल सांगतात.