पेशावर हल्ल्याच्या मास्टरमाईंडला घातलं कंठस्नान

पाकिस्तानच्या अशांत खबर एजन्सी भागात सुरक्षा दलानं तालिबानच्या एका आला कमांडरला (प्रमुखाला) ठार केलंय. पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या पेशावरमधील एका सैनिकी शाळेवर झालेल्या हल्ल्याचा हा दशतवादी मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जातंय. 

Updated: Dec 27, 2014, 08:03 AM IST
पेशावर हल्ल्याच्या मास्टरमाईंडला घातलं कंठस्नान title=

पेशावर : पाकिस्तानच्या अशांत खबर एजन्सी भागात सुरक्षा दलानं तालिबानच्या एका आला कमांडरला (प्रमुखाला) ठार केलंय. पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या पेशावरमधील एका सैनिकी शाळेवर झालेल्या हल्ल्याचा हा दशतवादी मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जातंय. 

'खबर एजन्सी'चे पॉलिटिकल एजन्ट साहब अली शाह यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिलीय. सुरक्षा दलांनी काल एका अभियानात जमरदच्या गुंदी भागात सद्दामला कंठस्नान घातलंय... सद्दामचा एक सहकारी जिवंत पकडला गेलाय, असं शाह यांनी म्हटलंय. 

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या तारिक गेदार गटाच्या सदस्य असलेल्या सद्दामनं १६ डिसेंबर रोजी पेशावरच्या एका आर्मी शाळेवर सात फिदाईन हल्लेखोरांच्या मदतीनं हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात १३२ मुलांसह १४८ जण ठार झाले होते. 

गेल्या वर्षी पख्तुनखवा भागात झालेल्या ११ सुरक्षा दलाचे जवान आणि आठ स्काऊटची हत्येचा कट रचण्यातही सद्दामचा हात होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.