सीरिया : ISISला जेरीस आणण्यासाठी रशियाने कडक पाऊल उचलले आहे. फ्रान्समधील पॅरिस हल्ल्यानंतर रशियाने एकदम आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सीरियातील ISISचे मुख्यालाय असलेल्या राक्का शहरावर व्हाईट फॉस्फरसने हल्ला चढवलाय.
रशिया आणि सीरियातील यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असून रशियाने युद्धच पुकारल्याचे दिसून येत आहे. सीरियावर आता अत्यंत घातक अशा व्हाईट फॉस्फरसने हल्ला चढवलाय. तसा दावा सीरियातील ISISने केलाय.
सीरियातील राक्कामध्ये ISISचे मुख्यालय आहे. मात्र, मानवी वस्तीवर अत्यंत घातक रासायनिक पदार्थ वापरण्यावर जिनेव्हा करारानुसार बंदी आहे. ही बंदी मोडून रशियाने हा हल्ला केलाय. रशियाने जागित युद्धाचे नियम धाब्यावर बसविल्याचे ISISने म्हटलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.