नवी दिल्ली : सोशल मीडियात सॅमसंग कंपनी इलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या बॅटरी उत्पादनावर लक्ष केंद्रित करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. सॅमसंग ही बॅटरी सॅमसंग टेसला मोटर्ससाठी बनवत असल्याची ही अफवा पसरली होती. या अफवेवर टेसला मोटर्सचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्विट करत पडदा टाकला आहे.
मस्क यांच्या ट्विटमुळे सॅमसंग एसडीआयला मोठं नुकसान झालं आहे. यामुळे सॅमसंगच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीला ३८.१८ अरब रुपयांचे नुकसान झाले आहे. टेसला मोटर्स आपल्या इलेक्ट्रॉनिक गाड्यांमध्ये फार पूर्वीपासून पॅनासोनिक कंपनीच्या बॅटरी वापरत आहे. मस्क यांच्या ट्विटनंतर सॅमसंगच्या शेअरमध्ये घसरण तर पॅनासोनिकच्या निर्देशांकात ३ टक्क्यांची वाढ झाली आहे.