इस्लामाबाद : भारतावर सतत कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानचं खरं रूप पुन्हा एकदा समोर आलं आहे. दहशतवादी असलेल्या बुरहान वाणी याचे पोस्टर्स पाकिस्तानच्या आझादी एक्स्प्रेसवर लावण्यात आले आहेत.
21 वर्षीय बुरहान मुझफ्फर वाणी हा हिजबुल मुजाहिद्दिनचा दहशतवादी आहे. 8 जुलै राजी श्रीनगर येथे भारतीय सुरक्षा दलांकडून त्याचे एन्काऊंटर करण्यात आले होते. काश्मिर खोऱ्यात या घटनेचा निषेध केला जात आहे.
आझादी एक्स्प्रेसमध्ये वाणीला जागा मिळल्यामुळे आपण खूश असल्याचं ट्विट सय्यद अली शाह गिलानी यांनी केलं आहे. तर सय्यद सलाउद्दीन यांनी जाहीरपणे भारतावर अणुहल्ला करण्याची धमकी दिली आहे. यावरून पाकिस्तानमध्ये किती उघडपणे दहशतवाद पोसला जात आहे हे दिसून येते.