पैशाचा हव्यास, २७४२ व्यक्तींसोबत शारिरीक संबंधासाठी पत्नीला जबरदस्ती

 एका व्यक्तीने आपल्या पत्नीला २७४२ व्यक्तींसोबत सेक्स करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीचा देहाचा बाजार मांडला आणि चार वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींशी तिला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. 

Updated: Oct 23, 2015, 06:09 PM IST
पैशाचा हव्यास,  २७४२ व्यक्तींसोबत शारिरीक संबंधासाठी पत्नीला जबरदस्ती title=

पॅरीस :  एका व्यक्तीने आपल्या पत्नीला २७४२ व्यक्तींसोबत सेक्स करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीचा देहाचा बाजार मांडला आणि चार वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींशी तिला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. 

वेबसाइट 'मिरर डॉट को डॉट यूके' ने दिलेल्या बातमीनुसार कोर्टात सुनावणी  दरम्यान या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, त्याने आपल्या पत्नीला चार वर्षात २७४२ ग्राहकांकडे पाठविले. कायदेशीर कारणांमुळे या व्यक्तीची ओळख सांगण्यात आली नाही. हा व्यक्ती आपल्या पत्नीकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता. त्यातून दर महिन्याला कथितपणे ५००० डॉलर कमवत होता. 

हा व्यक्ती उत्तर पॅरीसमध्ये आपल्या घरात हा व्यवसाय करत होता. व्यक्तीने आपल्या पत्नी आणि पाच वर्षाच्या मुलासह राहत होता. 

व्यक्ती आपल्या घराच्या बाहेर कारमध्ये मुलासोबत वाट पाहत असे तर ४६ वर्षीय पत्नी ग्राहकांना भेटत असे. व्यक्तीने इंटरनेटवर आपल्या पत्नीचे प्रोफाइल टाकत होता आणि ग्राहकांना आकर्षीत करत होता. पोलिसांनी गेल्या आठवड्यात दोघांना अटक केली. पती विरोधात देहव्यापारात पत्नीला लोटल्याचा गुन्हा दाखल केला आहे. महिलेला तो व्यक्ती छळ करत असल्याचे कोर्टाचे म्हणणे आहे. 

फ्रान्समध्ये देह व्यापाराला कायदेशीर मान्यता पण वेश्यावृत्तीसाठी प्रेरित करणे अपराध आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.