मुंबई : खरं तर एखाद्या देशाची श्रीमंती अथवा गरिबी मोजण्यासाठी अर्थशास्त्राता काही सूत्रं आहेत तसेच काही गणितं केली जातात. त्याचे विविध निकष ठरवलेले असतात. मात्र यापैकी एका निकषाविषयी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. याचं कारण म्हणजे त्याचा संबंध महिलांच्या स्कर्टशी किंवा पुरुषांच्या अंतर्वस्त्राशी आहे. ज्या देशातील महिला जितका लहान स्कर्ट घालतात तितका तो देश श्रीमंत असतो, असा हा अभ्यास सांगतो.
ज्या देशातील मुली लांब स्कर्ट घालतात त्या देशाची आर्थिक हालत कमजोर असल्याचे या अभ्यासानुसार मानले जाते. तुम्हाला वाटत असेल की हे कोणते नवीन सूत्र आहे, तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण, अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ जॉर्ज टेलर यांनी १९२६ साली हे सूत्र सांगितले आहे.
देशातील मुलींच्या स्कर्टकडे पाहून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती ते दर्शवत असत. या समीकरणानुसार जसजशी देशातील बाजारपेठ कमजोर होत जाते तसतसे छोटे स्कर्ट घालण्याची मुलींची हौस कमी होत जाते. आर्थिक मंदीच्या काळात मुलींनी छोटे स्कर्ट घालणे कमी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुली आपले सामाजिक स्टेटस दाखवण्यासाठी छोटे कपडे घालतात असे त्यांचे म्हणणे आहे.
मुलींच्या स्कर्टवरुन अंदाज लावला जातो तर पुरुषांचे अंतर्वस्त्र असणाऱ्या त्यांच्या अंडरवेअरवरुनही देशांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज लावता येतो. एखाद्या देशातील पुरुष किती अंडरवियर खरेदी करतात यावरुन त्या देशाची आर्थिक हालत कशी आहे हे सांगितले जाऊ शकते. देशाची आर्थिक स्थिती खराब असेल तर अंडरवियर खरेदी करण्याचे इरादे पुरुष भविष्यावर सोडतात.
जेव्हा पैसे असतात तेव्हा अंडरवियर खरेदी करण्याचे प्रमाण जास्त असते. २००८ च्या आर्थिक मंदीनंतर २०११ साली जेव्हा सुबत्ता आली तेव्हा अमेरिकेत पुरुषांची अंडरवियर खरेदी सात टक्क्यांनी वाढली होती, असे असोसिएटेड प्रेसने म्हटले होते