आयुष्यात क्लासमेटशी अशी भेट कधीच व्हायला नको?

तुम्ही आणि तुमचा क्लासमेट आयुष्यात कधी भेटले तर तो अशा परिस्थिती भेटू नये असं तुम्हाला खालील बातमी वाचल्यावर नक्की वाटेल.

Updated: Jul 6, 2015, 06:49 PM IST
आयुष्यात क्लासमेटशी अशी भेट कधीच व्हायला नको? title=

न्यूयॉर्क  : तुम्ही आणि तुमचा क्लासमेट आयुष्यात कधी भेटले तर तो अशा परिस्थिती भेटू नये असं तुम्हाला खालील बातमी वाचल्यावर नक्की वाटेल.

अमेरिकेत एका दरोडा प्रकरणाची सुनावणी सुरू होती, तेव्हा महिला न्यायाधीशाने आरोपीला अनोखे प्रश्न विचारले. अर्थात न्यायाधीशांनी आरोपीला ओळख विचारली. 

( आधी सर्वात खाली असलेला व्हिडीओ पाहा आणि त्यानंतर संपूर्ण बातमी वाचा )

कारण आरोपीला न्यायमूर्तीं मिंडी ग्लेझर यांनी ओळखलं होतं, त्यांनी मिस्टर बुथ यांना एक प्रश्न विचारला.

महिला न्यायमूर्ती मिंडी ग्लेझर - मिस्टर बुथ मी तुम्हाला काही विचारू इच्छीते.

आरोपी बुथ - हो मॅम विचारा. 

न्यायमूर्ती - तुम्ही नॉटीलस माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलंय ना?

तेव्हा एक क्षण आरोपी आणि न्यायमूर्तींनी एकमेकांकडे पाहिलं आणि आरोपी बुथ यांना रडू कोसळलं.
 
आरोपी बुथ - मी ओळखलं, असं सांगून तो रडू लागला, 'ओ माय गुडनेस' असं आरोपी पुन्हा-पुन्हा म्हणत रडत होता.

न्यायमूर्ती - मला तुम्हाला येथे पाहून आश्चर्य वाटतंय, असं का घडलं, पण मी तुम्हाला येथे पाहतेय, मला माफ करा.

नंतर या महिला न्यायाधीशांनी कोर्टाला सांगितलं, "हे शाळेत एक चांगला मुलगा म्हणून ओळखले जात होते. मी यांच्यासोबत फुटबॉल देखील खेळले आहे. सर्व मुलं यांच्याकडे पाहून फुटबॉल शिकत होते, मात्र आज काय झालं आहे हे?"

या नंतर न्यायमूर्तींना त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत, अशी आशा व्यक्त केली की या कठीण परिस्थितीतून तुम्ही बाहेर यालं. तुम्ही यातून नक्की बाहेर याल, आणि एक चांगलं जीवन जगाल अशी मला आशा आहे, असं ही त्यांनी सर्वात शेवटी सांगितलं.

पाहा हा व्हिडीओ, जेव्हा दोन क्लासमेट समोर येतात

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.