लंडन: ब्रिटनच्या १६ वर्षीय विद्यार्थ्याला आपली टॉपलेस सेल्फी पाठवणाऱ्या शिक्षिकेवर पाच वर्षांची बंदी घालण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार हायस्कुल टीचर लिंडा हार्वेनं विद्यार्थ्यांशी फेसबुकद्वारे संपर्क केला होता आणि नंतर फोटो पाठवायला सुरूवात केली.
४३ वर्षीय लिंडा हार्वेनं सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकद्वारे विद्यार्थ्याशी संपर्क साधला. जो लंकाशायरच्या पार्क हायस्कूलमध्ये शिकत होता. यानंतर दोघांमध्ये फोनवर नंबर एक्स्चेंज झाले आणि ते एकमेकांना पर्सनल मॅसेजेस आणि फोटो पाठवू लागले.
आरोप आहे की, लिंडानं काही दिवसांनंतर विद्यार्थ्याला आपले सेमी न्यूड फोटो पाठवणं सुरू केलं. ज्यात एक टॉपलेस सेल्फी पण आहे. डेली मेल वृत्तपत्रानुसार चौकशीमध्ये हे पुढं आलंय की, लिंडानं आपल्या शिक्षकी पेशाला बदनाम केलंय. अशात तिला शाळेतील आपलं १० वर्षांचं करिअर सोडायला सांगितलंय. समितीनं शिफारीश केली, तिच्यावर पुढे शिकविण्याबाबत बंदी घालावी. तसंच २०१९ पर्यंत म्हणजे तब्बल ५ वर्ष ती या निर्णयाच्या विरोधात अपिल करू शकत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.