लिसेस्टर : जर तुम्हाला तब्बल ३४४ कोटी रुपयांची लॉटरी लागलीये मात्र ही रक्कम तुम्हाला मिळू शकत नाही. तर तुम्हाला कसे वाटेल. असंच काहीसं डेविड आणि एडविना नायलन या जोडप्यांसोबत झालंय.
ब्रिटनमधील या जोडप्याला अवघ्या २०० रुपयांमुळे तब्बल ३४४ कोटी रुपये गमवावे लागले. लिसेस्टर यांना लॉटरीद्वारे ३४४ कोटींचे बक्षीस लागले होते. जेव्हा त्यांना लॉटरी लागल्याचे समजले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मात्र वेबसाईटवर याबाबत अधिक माहिती मिळवली असता त्यांना समजले की त्या ही रक्कम घेऊ शकत नाहीत.
जेव्हा या दाम्पत्याने लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते तेव्हा त्यांच्या अकाउंटमध्ये पुरेसा बॅलन्स नव्हता ज्यामुळे या रकमेचे ट्रान्झॅक्शन होऊ शकले नाही. लॉटरी खरेदी करताना यांच्या अकाउंटमध्ये २०० रुपये नव्हते.
डेविडने 1, 2, 4, 19, 28, 41 नंबरचे लॉटरीचे तिकीट ऑनलाइन घेतले होते. मात्र नायलन यांच्या अकाउंटमध्ये ६० पेनी होती. नायलन यांनी लगेचच टॉप-अप केले आणि पुन्हा तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर तो नंबर मिळाला नाही आणि याच नंबरच्या लॉटरीचे तिकीट लागले.