अविश्वसनीय, रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये फिरत होता वाघ, व्हिडिओ व्हायरल

तुम्हांला विश्वास बसेल की नाही माहिती नाही. पण हे खरं आहे. एक वाघ चक्क दोहा शहरातील ट्रॅफिकमध्ये फिरताना दिसल्याचा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल होतो आहे. 

Updated: Mar 8, 2016, 10:01 PM IST
अविश्वसनीय, रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये फिरत होता वाघ, व्हिडिओ व्हायरल  title=

दोहा : तुम्हांला विश्वास बसेल की नाही माहिती नाही. पण हे खरं आहे. एक वाघ चक्क दोहा शहरातील ट्रॅफिकमध्ये फिरताना दिसल्याचा व्हिडिओ सध्या यूट्यूबवर व्हायरल होतो आहे. 

ही घटना मंगळवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. दोहाच्या एक्स्प्रेस हायवेवर हा वाघ थांबलेल्या कारसमोरून जात होता. एका कारमधील व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर टाकला. 

ट्रॅफिकमध्ये वाघ फिरत होता, या वाघाला पकडण्यात आले असून पण याबाबत कोणतीही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. 

गल्फ देशात काही व्यक्ती जंगली प्राणी पाळतात. त्यातील एक असावा असे म्हणण्यात येत आहे. 

पाहा एक्स्प्रेस हायवेवर फिरतो वाघ...