बिजिंग : अमेरिकेची कम्प्यूटर क्षेत्रातली दबंग कंपनी अॅपलच्या अॅप स्टोरअरवर चीनमध्ये एका मोठ्या व्हायरसचा हल्ला झाला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये आयफोन आणि आयपॅडच्या लोकप्रिय अॅप्लिकेशनमध्ये Xcode Ghost नावाचा दोष असलेलं सॉफ्टवेअर दिसून आलं आहे. मात्र XcodeGhost या व्हायरसला हटवण्यासाठी अॅपलच्या टीमने अटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत.
या आधी दिसला होता हा व्हायरस
या आधी एका मोठ्या सायबर सिक्युरिटी फर्मने Xcode Ghost नावाचा मालवेअर असल्याची माहिती दिली होती. याआधी या फर्मच्या अॅपमध्ये हा व्हायरस शेकडोच्या संख्येत दिसून आला होता.
अॅपल अॅप स्टोअरवरचा सर्वात मोठा हल्ला
अॅपल अॅप स्टोअरवर झालेला हा व्हायरसचा हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे, याचा रिपोर्ट देखील दाखल करण्यात आला आहे.
असा झाला हल्ला
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्सने अधिकृत सॉफ्टवेअर डेव्हलपर्सला iOS आणि Mac अॅप बनवण्यासाठी, अॅपलचं खास सॉफ्टवेअर बनवलं आणि त्याचं नकली वर्जन वापरण्यास अधिकृत सॉफ्टवेअरला राजी केलं.
अॅपलच्या या विशेष सॉफ्टवेअरचं नाव Xcode असल्याचं सांगण्यात येत आहे.
नव्याने डेव्हलप करावे लागणार काही अॅपल अॅप्स
अॅपल प्रवक्ता क्रिस्टीन मोनागन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही डेव्हलपर्स सोबत काम करत आहोत, आणि हे ठरवण्यात आलं आहे की, आपलं अॅप पुन्हा तयार करण्यासाठी त्यांनी Xcode च्या योग्य वर्जनचा वापर करावा.
काही महत्वाच्या अॅपना फटका
रिसर्चसने दिलेल्या माहितीनुसार अॅपमध्ये टेनसेंट होल्डिंग लिमिटेडचा प्रसिद्ध चॅट अॅप 'वीचेंट', कार हेलिंग अॅप 'दीदी कुऐदी' आणि इंटरनेट पोर्टल 'नेटइज इंक'च्या म्यूझिक अॅपचा समावेश आहे.
चीनची सुरक्षा एजेंन्सी Qihoo360 टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या ब्लॉगवर Xcode Ghost वायरसमुळे अॅपवर परिणाम झाल्याची माहिती दिली आहे.
मात्र अजून अॅपले अजून अशी कोणतीही माहिती दिलेली नाही की, अॅपलच्या किती अॅपवर या व्हायरसचा परिणाम झाला. मात्र व्हायरस असलेल्या अॅप्सना अॅपल स्टोअरमधून हटवण्यात आलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.