बीजिंग : आयफोनसाठी कोण काय करेल याचा नेम नाही, आयफोन पाहिजे यासाठी आपल्या बॉयफ्रेंडशी वाद झाल्यावर एका युवतीने चक्क आपले सारे कपडे उतरविण्याची लज्जास्पद घटना चीनमध्ये घडली. अनेक जण रस्त्यावर असताना या चायनीज युवतीने आपले एक एक कपडे उतरविले.
एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही सर्व घटना कैद झाली. या व्हिडिओत काही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यानंतर एक युवती आपल्या बॉयफ्रेंडशी भांडू लागते. यावेळी तीला आयफोन पाहिजे असतो. बॉयफ्रेंड तिला समजविण्याचा प्रयत्न करतो. पण ती त्याचे एक ऐकत नाही.
आपल्या बॉयफ्रेंडशी भांडताना ही तरूणी एक-एक करून आपले कपडे उतरविले. गर्लफ्रेंड न्यूड पाहिल्यावर त्याला धक्का बसला, असे करताना त्याने गर्लफ्रेंडला रोखले पण तीने एकही ऐकले नाही.
पण बॉयफ्रेंडशी भांडण संपल्यावर ती युवती पुन्हा कपडे परिधान करून निघून गेली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.