आयफेल टॉवर पाहायचं व्हिसा मिळणार ४८ तासांत

Updated: Dec 1, 2014, 09:46 PM IST
आयफेल टॉवर पाहायचं व्हिसा मिळणार ४८ तासांत title=

नवी दिल्ली: भारतीयांचे फ्रान्समध्ये पर्यटनाचं प्रमाण काही महिन्यात वाढलं आहे. हे प्रमाण लक्षात घेऊन फ्रान्सच्या प्रशासनाने आज भारतीय पर्यटकांसाठी देण्यात येणाऱ्या व्हिसा सुविधेत नवी योजना आणली आहे.
 
फ्रान्समध्ये जाण्यासाठी भारतीयांना  अर्ज केल्याच्या ४८ तासात व्हिसाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी फ्रान्सने भारतात आठ नवीन केंद्रांची निर्मितीही केली आहे. फ्रान्सच्या राजधानीच्या आसपास भटकण्यासाठी पर्यटकांना ‘चलो पॅरीस’ नावाचं एक मोबाईल अॅप्लिकेशनही सुरू झालं आहे. 

फ्रान्सचे राजदूत फ्रॅकोईस रिचर यांनी सांगितले की, फ्रान्समध्ये येणाऱ्या भारतीय पर्यटकांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन फ्रान्सने हे पाऊल उचलले आहे. भारतीयांना फ्रान्समध्ये जाण्यासाठी सध्या भारतात मुंबई, दिल्ली, पाँडेचेरी, कोलकत्ता, बेंगलुरू येथे व्हिसा दिला जातो. या सर्व ठिकाणी १ डिसेंबरपासून अर्ज केल्याच्या ४८ तासात व्हिसा मिळणार आहे.
 
याशिवाय चंदीगड, जालंधर, पुणे, गोवा, अहमदाबाद, कोच्चि, हैदराबाद आणि जयपूर या शहरात व्हिसा देण्याची नवी केंद्र उभारण्यात येणार आहेत. जर तुम्ही फ्रान्समध्ये जात असाल तर तुम्हाला दोन दिवसात व्हिसा मिळेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.