नवी दिल्ली : एडिस डासांद्वारे पसरणाऱ्या 'झिका' या विषाणूने जगभरातील २३ देशांमध्ये थैमान घातलं आहे. मागील वर्षभरात या ३० ते ४० लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
झिका विषाणूची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या अर्भकावरही त्याचा परिणाम होत असल्याच्या शक्यतेने चिंतेचे वातावरण आहे. यामुळे एका देशात तर २०१८ पर्यंत गर्भवती न राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
ब्राझिलमध्ये गेल्या ४ महिन्यात सामान्य आकारापेक्षा लहान डोके असलेल्या बाळांचा जन्म झाल्याच्या ४००० हजार घटना नोंदवण्यात आल्या आहेत. कोलंबिया, जमैका, होंडुरास या देशांनीही महिलांनी काही महिन्यांपर्यंत गर्भवती राहू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
'झिका' विषाणूच्या विरोधात तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.