मुंबई : फिल्म कोरियोग्राफर फराह खान लवकरच छोट्या पदडद्यावर पाककलावर आधारित एक कार्यक्रम आणीत आहे. 'फराह की दावत' असे या कार्यक्रमाचे नाव असून आपल्या या शोमध्ये अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांना फराह एकत्र बोलविणार आहे.
फराहला एका टीव्ही शोमध्ये विचारण्यात आले, त्यावेळी ती म्हणाली शाहरुख आणि सलमान यांना एकत्र बोलविण्याबाबत कोण नाकारील. कलर्स चॅनेलवर २२ फेब्रुवारीपासून 'फराह की दावत' हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. यामध्ये अभिषेक बच्चन, आलिया भट्ट, मलायका अरोरा खान, रितेश देशमुख आणि जेनेलिया आपली पाककला कौशल्य दाखविणार आहेत.
बॉलिवूडमधील या मोठ्या स्टार कलाकारांच्या एपिसोडचे शुटींग आधीच झाले आहेत. शाहरुखला या शोमध्ये येण्याचा आनंद वाटत आहे. तो खूश आहे. मला खाणे बनविण्याबाबत आवड आहे. ते मला आवडते, असे शाहरुख यांने सांगितले.
फराह एक चांगली स्वयंपाक बनवते. शाहरुखने मला सांगितलेय, मी या कार्यक्रमात येणार आहे. तो त्याचा वादा पुरा करेल. तो मला पास्ता बनवून खायला देईल. माझा हा शो दाखवून देईल की, स्टारमंडळीही पाककौशल्यातही माहीर आहेत, असे फराह म्हणाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.