मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ४३ वर्षांची झाली. १ नोव्हेबर, १९७३ ला मँगलुरुमध्ये तिचा जन्म झाला होता. महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेकसोबत २० एप्रिल २००७ मध्ये तिचा विवाह झाला होता.
अभिषेक-ऐश्वर्या यांच्या लग्नाला ९ वर्ष झाली. त्यांना आता ४ वर्षाची एक मुलगी आहे. आराध्याचे ते आज पालक आहेत.
'ढाई अक्षर प्रेम के'मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकने पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. यानंतर 'उमराव जान'मध्येही दोघे एकत्र दिसले आणि यादरम्यान ते एकमेकांच्या जवळ आले.
'गुरू' सिनेमाच्या सेटवर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केल्याचं म्हटलं जातं. २००२ मध्ये अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा झाला होता पण एका वर्षातच त्यांचा संबंध मोडला होता. त्यानंतर ४ वर्षानंतर अभिषेक आणि ऐश्वर्याचा विवाह झाला.
अभिषेकने त्याचा सेहरा हटवत फॅन्सला त्याचा चेहरा दाखवला होता. या विवाहाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. एका मुलाखतीत अभिषेकने त्याने कसं ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं याबाबत खुलासा केला होता. टोरंटोमध्ये 'गुरू' सिनेमाच्या प्रीमियरनंतर हॉटेलच्या गॅलरीमध्ये उभं राहून अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं. प्रपोज करतांना तो खूप नर्वस असल्याचं त्याने म्हटलं आहे. प्रपोजचं उत्तर देण्यासाठी ऐश्वर्याने एक सेकंडचा देखील वेळ नाही घेतला असं त्याने म्हटलं आहे.