मुंबई : मराठीतून हिंदीत आपल्या संगिताचा डंका वाजविणारे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शन अजय अतुल यांनी आता पुन्हा एकदा मराठीत हिट ठरलेले गाण्याचे म्युझिक हिंदीत वापरले आहे. अक्षय कुमार याच्या आगामी ब्रदर्स चित्रपटात त्याने मराठी गाण्याचे संगीत वापरले आहे.
ब्रदर्स चित्रपटात करीना कपूर हिने एक आयटम साँग केले आहे. ‘मेरी सौ टके की’ या गाण्यासाठी अजय अतुल यांनी ‘जत्रा’ या मराठी चित्रपटातील ‘ये गो ये ये मैना पिंजरा बनया सोने का’ या मराठी गाण्यातील म्युझिकचा वापर केला आहे.
यापूर्वीही अजय अतुल यांनी मराठीत हिट ठरलेले ‘कोंबडी पळाली...’ या गाण्याचे म्युझिक हिंदीत ‘अग्नीपथ’ चित्रपटात ‘चिकनी चमेली’ गाण्यासाठी वापरले होते.
पाहू या करिना कपूरच्या या हॉट गाण्याची झलक
पाहू या ये गो ये मैना हे मूळ गाणे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.