मुंबई : आताचं वातावरण बघता मी सध्या पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करणार नाही, अशी रोखठोक भूमिका बॉलीवूड अभिनेता अजय देवगननं घेतली आहे.
एका हातानं टाळी वाजत नाही. इतके दिवस पाकिस्तानची संवाद सुरु होता, तरीही ते येऊन तुम्हाला मारत होते. तुमच्या येऊन कोणी कानफटात मारली आणि सांगितलं आता आपण संवाद साधू, तुम्ही याला तयार व्हाल का असा सवालही अजय देवगननं विचारला आहे. पैशांच्या आधी देश येतो, देश डुबला तर पैशांचं काय करायचं, असंही अजय देवगन म्हणाला आहे.