मुंबई : आमिर खानच्या आगामी सिनेमाचं दंगलचं शूटिंग पूर्ण झालं आहे. सिनेमाचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर आमीरने पार्टीचं आयोजन केलं होतं. आमीरने त्याच्या घरी या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी दंगल सिनेमाच्या कास्ट अँड क्रू मेंबरर्सना निमंत्रण होतं.
आमिर खानने त्याच्या घरी ही रॅपअप पार्टी दिली होती. पार्टीमध्ये आमीरचे काही खास मित्र देखील होते. दंगल सिनेमामध्ये आमीरच्या पत्नीची भूमिका करणारी साक्षी तन्वर देखील दिसली. प्रीतम, प्रोड्यूसर सिद्धार्थ रॉय कपूर आणि डायरेक्टर नितीश तिवारी देखील या पार्टीत उपस्थित होते. पण या पार्टीचं आकर्षण होतं जॅकी श्रॉफ.