मुंबई : नेहमीच आपल्या नात्याला लपवून ठेवणारं कपल रणबीर आणि कतरिनानं जसा त्यांच्या आयुष्याच्या बाबतीत एक निर्णय घेतला. तो म्हणजे एकत्र राहण्याचा. तसाच निर्णय आता क्रिकेट आणि बॉलिवूडमधलं सध्याचं सेन्सेशनल कपल अनुष्का-विराटही रणबीर-कॅटचा कित्ता गिरवणार असल्याची बातमी सध्या चर्चेत आहे.
एका वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार रणबीर कपूर आणि कतरिना कैफ क्वार्टर रोड परिसरात घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहून खूप खूश आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीही असाच निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.
हल्लीच या दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यांनी त्यांच्या नात्याला आणखी पुढं नेण्याचा निर्णय केला आहे.
सूत्रांकडून माहिती आहे की विराट जेव्हा मुंबईत येतो तेव्हा तो अनुष्काला तिच्या घरी वर्सोवाला भेटण्यास जातो. वर्सोवाला अनुष्का तिच्या आई-वडिलांसोबत राहते. त्या दोघांनाही म्हणावा तसा वेळ एकत्र घालवणं शक्य होत नाही. त्यामुळंच कदाचित विराटनेंतिच्या घराच्या आसपासच एखादं अपार्टमेंट विकत घेण्याचा निर्णय केला आहे. जिथं ते दोघे एकत्र त्यांचा क्वालिटी टाइम घालवू शकतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.