मुंबई : रस्त्यावर झोपणा-या गोरगरिबांबाबत मुक्ताफळं उधळणा-या गायक अभिजीतनं आता माफी मागितलीय. मी लोकांच्या भावना दुखावल्यात. मी हात जोडून माफी मागतो असं अभिजीतनं म्हटलंय.
अभिजीतनं रस्त्यावर झोपणा-या गोरगरीबांची तुलना कुत्र्याशी केली होती. त्यानंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून मोठी टीका झाली होती. कुत्ता रोड पे सोएगा तो कुत्ते की मौत मरेगा, रोड गरीब के बाप की नही है’, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या गायक अभिजीत भट्टाचार्यविरोधात अंधेरी येथे आर पी आय च्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला.
सलमान हिट अँड रन प्रकरणी निकाल लागल्यानंतर गायक अभिजीतने रस्ते गरिबांच्या बापाचे नाहीत, फूटपाथवर झोपण्याची हौस असेल तर गावी जा, असे वक्तव्य केले होते.
ज्येष्ठ सिने अभिनेते ऋषी कपूर यांनी ख्यातनाम पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य याचं चांगलेच कान उपटलेत. काश. एका दिवसासाठी मला हुकूमशहा होता आलं असतं तर मी अभिजीतला नपुंसक बनवलं असतं... असा तिखट भडीमार ऋषी कपूर यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.